एलपीजी गॅसच्या दरात घट; व्यावसायिक सिलेंडर झाला एवढ्या रुपयांनी स्वस्त

महागाईचा सामना करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी घट झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात हा दिलासा मिळाला आहे. महागाईचा सामना करणाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या दरात मोठी घट झाली आहे. एलपीजी गॅस सिलिंडर कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात हा दिलासा मिळाला आहे.

जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक बदल होणार आहेत. या बदलाच्या परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 मे 2023 रोजी व्यावसायिक गॅसच्या किमतींत 172 रुपयांनी कपात करण्यात आली होती. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किमतीतही कपात झाली आहे.आता 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी हाच सिलेंडर 1856.50 रुपयांना मिळत होता.मुंबईत 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडर 1725 रुपयांना विकला जात आहे. . गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅसचा दर 1856.50 रुपये प्रति सिलेंडर होता. त्याचबरोबर घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1103 रुपयांवर कायम आहे.

दिल्लीमध्ये सिलिंडर 1773 रुपयांना विकला जात आहे.चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत 1973 रुपये आहे. कोलकातामध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 1960.50 रुपयांवरून 1875.50 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतींमध्ये दिलासा देण्याबरोबरच जेट इंधनाच्या (एअर फ्युएल) किमतीतही तेल कंपन्यांनी कपात केली आहे. किंमतीत सुमारे 6,600 रुपयांची घट झाली आहे. याचा परिणाम आगामी काळात विमान प्रवासावर होऊ शकतो. 1 जूनपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतींत कोणताही बदल केलेला नाही.