महाराष्ट्र आणखी एका लॉकडाउन साठी तैयार आहे का ?


कोरोनाची परिस्थिती भारतात पुन्हा एकदा कठीण होत चालली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या वाढणाऱ्या केसेस, आणि त्यात पुन्हा एकदा सुरु झालेले परिवहन, फ्लाइट्स, गाड्या यामुळे लोकांची ये-जा. कोरोनाची तिसरी लाट आली तर त्यासाठी आपला महाराष्ट्र सज्ज आहे का ? कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आहे, कि महाराष्ट्रात लॉक डाउन लावायला हवा कि नको ? तसेच हा निर्णय ते येत्या ८ दिवसात घेणार असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथे लॉकडाउनचे नियम लावण्यात आले आहे. आणि पुणे आणि मुंबई संदर्भात येत्या ८ दिवसात हा निर्णय घेण्यात येणार आहे. मात्र जर परिस्थिती पुन्हा एकदा चिघळली, तर महाराष्ट्र राज्य या परिस्थितीसाठी सज्ज आहे का ? महाराष्ट्र राज्यात आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे, हळू हळू का होईना मात्र राज्यातील उद्योग धंदे, बाजारपेठा सुरु झाल्या आहेत, असे असताना पुन्हा एकदा जरका लॉक डाउन झाले, तर मात्र राज्याच्या अर्थव्यवस्थेचे काय ? राज्याच्या जनतेचे काय ? पुन्हा एकदा त्यांना आर्थिक भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागेल का ? का त्यासाठी काही वेगळी उपाययोजना तैयार आहे ? असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर उपस्थित झाले आहेत ?

पुण्यात काही प्रमाणात लॉकडाउनची सुरुवात झाली आहे. पुण्यासोबतच नागपूर येथे देखील आठवडीबाजार, मंगल कार्यालय, हॉल, लॉन, रिसॉर्ट यावरही निर्बंध कठोर करत ७ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शनिवार, रविवार बाजारपेठ व आठवडीबाजार बंद असतील, अशी माहिती नितीन राऊत यांनी दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल. हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये केवळ ५० टक्के क्षमतेने लोकांना प्रवेश असले, असे डॉ. राऊत यांनी स्पष्ट केले.

पुढील काही दिवस महाराष्ट्रासाठी खूप कठीण आहेत, आणि निर्णय़ घेण्यासाठी महत्वाचे आहेत. नागरिकांनी स्वत:च खूप गरज नसल्यास बाहेर पडणे टाळावे, समारंभांना, गर्दीच्या ठिकाणी जावू नये अशी विनंती नागरिकांना करण्यात आली आहे. तसेच ल़कडाउन लागल्यास, किंवा कोविडची तिसरी लाट मोठ्या प्रमाणावर आल्यास महाराष्ट्रात रुग्णालयांची परिस्थिती ठीक आहे का ? हव्या त्या सुविधा उपलब्ध आहेत का ? याची पाहणी करणे देखील आवश्यक आहे, असेही नागरिकांचे मत झाले आहे. पुढे काय होतं, हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.