महाराष्ट्रात वॅक्सीनचा देखील घोळ ?



गेल्या एक वर्षात महाराष्ट्राने अनेक समस्यांचा सामना केला आहे. अगदी कोरोना व्हायरसच्या तडाख्यापासून ते प्रवसी मजुरांच्या प्रश्ना पर्यंत, अवकाळी पावसापासून ते शेकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यु पासून ते सचिन वाझे प्रकरणापर्यंत, कंगना रणौतच्या काँट्रोव्हर्सी पासून ते अर्णब गोस्वामी चौकशी प्रकरणापर्यंत अनेक घटना गेल्या एक वर्षात महाराष्ट्रात घडल्या आहेत. आणि महाराष्ट्र सरकार या घटना हाताळायला कमी पडतंय हे वारंवार समोर आलं आहे. आता सध्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाच्या राक्षसाने डोके वर काढले आहे. त्यात महाराष्ट्र सरकार कडून अधिक लसींची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे, मात्र केंद्राकडून करण्यात आलेला खुलासा धक्कादायक आहे, आणि आधी पाठवलेल्या लसींचे महाराष्ट्र सरकारने काय केले हा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे.



महाराष्ट्राला या आधी ५४ लाख लसी पाठवण्यात आल्या होत्या, ज्या पैकी केवळ २३ लाख लसींचा वापर महाराष्ट्र सराकारने केल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आपल्या ट्वीट मधून केला आहे, ते या ट्वीटमध्ये म्हणतात कि, एकूण ५६% लसींचा वापरच महाराष्ट्र सरकारने आतापर्यंत केला नाही, आणि तरी देखील महाराष्ट्र सरकार कडून अधिक लसींची मागणी करण्यात आली आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात सरकारचा भोंगळ कारभार आणि आता खराब प्रशासकीय कारभारामुळे महाराष्ट्राच्या जनतेला यातना भोगाव्या लागत आहेत.

जावडेकरांच्या या ट्वीटला राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील रीट्वीट केले आहे. महाराष्ट्रात एकूणच सध्या अनेक आघाड्यांवर हे आघाडी सरकार अयशस्वी ठरतंय. संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महाराष्ट्र पुन्हा एकदा पहिल्या नंबर वर जाऊन पोहोचले आहे. अगदी एक वर्षाआधी होते तसेच. त्यामुळे जनतेच्या मनात पुन्हा एकदा भितीचे वातावरण आहे, पुन्हा एकदा कडक लॉकडाउन लागते का काय असे विचार जनतेच्या मनात येत आहेत. त्यामुळे पुढे काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.