महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढण्याची शक्यता…!


महाराष्ट्रात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन देखील वाढवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना काळात लोकांनी घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलिस कार्यरत आहेतच मात्र तरी देखील कोरोनाची परिस्थिती ठीक होण्याचे नाव घेत नाही. आणि याच पार्श्वभूमीवर हा लॉकडाउन वाढवून ३१ मे पर्यंत करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्र सरकारने या काळात आंतरराज्यीय वाहतूकीवर बंधनं आणली होती, तसेच इंटरसिटी देखील वाहतूक रोखण्यात आली होती. आधी राज्य सरकारने २२ एप्रिल ते १ मे लॉकडाउन जाहीर केला. त्यानंतर हा लॉकडाउन वाढवून १५ मे पर्यंत करण्याता आला आणि आता हा लॉकडाउन वाढवून ३१ मे पर्यंत करण्यात येणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महाराष्ट्रात एकूणच ढीले प्रशासन, वाढते रुग्ण, आणि सुप्तावस्थेत असलेली व्यवस्था बघता कोरोनाची परिस्थिती आणखी किती दिवस ठाण मांडून बसते ? हे सांगणं जरा अवघड झाले आहे. एकूणच ऑक्सिजन सिलेंडरची काळाबाजारी, नागरिकांची लूट असे देखील प्रकार सध्या बघायला मिळताएत. एकूण काय तर परिस्थिती गंभीर आहे.

असे असताना सरकार विरोधी पक्षावर टीका करण्यात मग्न आहे, तसेच ऐन कोरोनाच्या वाढत्या काळात सरकार भ्रष्टाचारामध्ये लिप्त असलेले देखील दर्शनास आले. त्यामुळे महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचा आता वाली कोण ? आणि पुढे काय होतं ? हा लॉकडाऊन आणखी किती वाढतो, तसे झाल्यास छोट्या आणि मध्यम आकाराच्या व्यवसायांचे काय होईल हा प्रश्न मात्र अजून सुटलेला नाही.