
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक लोक मृत्युमुखी पडले आणि यावेळी कमी वयाची, तरुण नागरिकांची संख्या जास्त होती. असे असताना देशात कुठल्याही सामूहिक भेटींवर किंवा गर्दी करणाऱ्या प्रसंगांवर बंदी आणली पाहिजे ही मागणी देशाचे नागरिक सुरुवाती पासूनच करत होते. अगदी कुंभ मेळ्यापासून ते निवडूकांपर्यंत सगळ्यावर बोट ठेवण्यात आले आणि टीका करण्यात आली मात्र आता ज्यावेळेला पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे नाव घेत काही लोक “किसान आंदोलन” करण्यासाठी पुढे येत आहेत, त्यावेळी विरोधी पक्ष गप्प का ? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
२०२० मध्ये देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नाव घेत किसान आंदोलन करण्यात आले होते. दिल्लीच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या होत्या. दिल्लीच्या चारही सीमांवर हे शेतकऱ्यांच्या वेषात असलेले गुंड ठाण मांडून बसले होते. मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. जानेवारीच्या दरम्यान ट्रॅक्टर आंदोलन करण्यात आले आणि दिल्लीच्या लाल किल्यावर ये आंदोलनकर्त्यांनी धुमाकूळ केला. अतिशय भयंकर असे हे दृश्य होते, हे सर्व होत अतसाना कितीतरी पोलिसांना मारहाण झाली, काही पोलिस दगावले. मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण होत राहीलं, केंद्र सरकारलाच शिव्या देण्यात आल्या, मात्र राकेश टिकैत सारख्या नेत्यांना कोणीच आळा घातला नाही.
त्याचाचा परिणाम कि काय जणू पुन्हा एकदा देशाला संकटात टाकण्यासाठी आणखी एका “किसान आंदोलना”ची तयारी करण्यात येत आहे. देश आता कुठे कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेतून सावरतोय. म्हणावा तसा अजूनही सावरलेला नाही. मात्र तसे असताना देखील शेकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जमा होण्याची परवानगी का मिळते ? शेतकऱ्यांच्या नावाखाली कोरोनाचे सुपरस्प्रेडर तयार होत आहेत, हे नाही का कुणाच्याही लक्षात येत ? आणि इतकं सर्व होऊन सुद्धा या आंदोलनाला परवानगी देण्यात येईल असे चिन्ह दिसून येत आहेत. देशाच्या आरोग्यासाठी हा निर्णय कितपत बरोबर आहे ?
दिल्ली आणि दिल्लीच्या आसपास हे सर्व आंदोलन पुन्हा एकदा होणार. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली देशातील टॉप ५ प्रभावित राज्यांमधील एक आहे. ऑक्सिजनची कमतरता, हॉस्पिटल बेड्सची कमतरता हे सर्व होत असताना पुन्हा एकदा आाज पण दिल्ली आणि आसपासच्या ठिकाणच्या लोकांचा जीव धोक्यात घातलोय असे नाही का वाटत ? दिल्ली वासियांना लस उपलब्ध होत नाहीये, १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या लोकांना लसीकरणासाठी केंद्र सापडत नाहीये, कुठेच बुकिंग होत नाहीये, सध्या याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कि कुणाच्याही जीवापेक्षा हे एक आंदोलन महत्वाचे आहे ? असा प्रश्न इथे उपस्थित होतो.
हे आंदोलन आताच का ? आणि याचे किती भयंकर परिणाम संपूर्ण देशाच्या आरोग्यावर होणार आहे, याबद्दल आपल्याला कदाचित अजून कल्पना नाही. मात्र हे झाल्यास देशाला वेळेआधीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सामोरी जावे लागेल, आणि तेव्हा हा कोरोना काय आकांत तांडव करेल याची कल्पना सुद्धा करणे शक्य नाही. त्यामुळे आणि वेळीच सावध झालो तर ठीक आहे, मात्र तसे न झाल्यास….. काळ कठीण आहे…!
