
‘ओबीसींच्या प्रश्नांवर आमची लढाई यापुढेही सुरूच राहील. येत्या फेब्रुवारी महिन्यात तीन चतृर्थांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या आहेत. तोपर्यंत सरकारला वेळ काढायचा आहे का, अशी शंका येते आहे”, असं आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
लोकशाहीला कुलूप बंद करण्याचं काम या सरकारने केलं
अधिवेशन काळात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाले याबाबत बोलताना ते म्हणाले,” एकतर अधिवेशन घ्यायचं नाही. मला तर आश्चर्य वाटतं अधिवेशन आलं की व्हायरस वाढू लागतो. कोरोना येतो, डेल्टा येतो. नंतर मंत्र वातावरण पूर्ववत होतं. जनतेच्या हिताची सर्व आयुध थोपवण्याचं काम हे सरकार करते आहे. ६१ वर्षाच्या महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासात असं कधीच झालं नव्हतं, कुठलंच आयुध वापरता येणार नाही.असं ठराव तयार झाला. लोकशाहीला कुलूप बंद करण्याचं काम या सरकारने केलं. मराठा सांजचे शेतकरी, विद्यार्थी, आरक्षण यांसारखे जनतेचे प्रश्न आम्ही सरकारकडे मांडताच राहू,अतिशय जबाबदारीने सांगतो, भाजपाच्या एकाही आमदाराने पिठासीन अध्यक्षांना शिवी दिलेली नाही. शिवी कुणी दिली, हे मी योग्यवेळी सांगीन, असे फडणवीस यांनी सरकारला ठणकावून सांगितले.
लेखक हरी नरके हे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, हरी नरके ओबीसीचे नव्हे एनसीपीचे प्रवक्ते झालेत ! समाजाच्या नेत्यांनी प्रवक्त्यांसारखे काम करू नये. ओबीसी आरक्षणासंदर्भात १३ डिसेंबर २०१९ ते ४ मार्च २०२१ या संपूर्ण कालावधीत राज्य सरकारने काय कारवाई केली, हा प्रश्न विचारला का? कुणी कसेही वागले तरी विचारवंतांवर आम्ही टीका करीत नाही, असे म्हणत त्यांनी हरी नरकेंच्या टीकेला उत्तर दिले.
ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा करणे हे ४ महिन्यांचे काम
पुढे ते म्हणतात,”ओबीसींचा एम्पिरिकल डेटा गोळा करणे हे ४ महिन्यांचे काम. फेब्रुवारीत ३ चतुर्थांश निवडणूक होत आहेत, तोपर्यंत वेळ घालवायचा आहे. हे काम सहज होऊ शकणारे आहे. मी हेच म्हटले की, जर तुम्हाला जमत नसेल तर मला सूत्र द्या, मी करून दाखवितो. आम्ही जे बोलतो ते करून दाखवितो.मात्र सरकाराला ते करायचेच नाही, अशी घणाघाती टीकाही फडणवीस यांनी केली. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्या प्रकरणावर बोलताना फडणवीस म्हणाले, स्वप्नील लोणकरचे आत्महत्या करणे सर्वाना मनाला चटका लावून गेले. तरीही सरकार एमपीएससीच्या जागा भरण्याबाबत गंभीर नाही, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली.
सहकार खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा लाभ होईल
केंद्रीय मंत्री अमित शाह हे राजकारणात येण्यापूर्वी सहकारात होते. गुजरातमध्ये सहकारात त्यांनी केलेले काम अतिशय मोठे आहे. त्यामुळे स्वाभाविकच हे खाते त्यांच्याकडे गेलेकेंद्रात सहकार खाते नव्हते, तर म्हणायचे केंद्र सरकार सहकाराला मारतं आहे. आता ७० वर्षांनी पहिल्यांदा सहकार खाते तयार झाले, तर म्हणतात की, सहकाराचा केंद्राशी काय संबंध? या खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला मोठा लाभ होईल, अशी अशाही फडणवीस यांनी व्यक्त केली.
