
उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी जनसंख्या नियंत्रण निती लागू केल्यानंतर संपूर्ण देशात जनसंख्या नियंत्रणाविषयी चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशात ही निती लागू केली गेली पाहिजे असे अनेकांचे मत झाले आहे. याविषयी माध्यमांशी संवाद साधताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या नितीचे समर्थन केले आहे, तसेच संपूर्ण देशात हा कायदा लागू झाला पाहिजे असे त्यांनी म्हचले आहे.
“आज भारत देशासमोर जनसंख्या हा एक मोठा प्रश्न आहे. आपल्याला चीन व्हायचे नाही, त्यामुळे जनसंख्या नियंत्रणाविषयी कायदा हा संपूर्ण देशात लागू झाला पाहिजे.” असे मत फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. देशाच्या विकासाच्या दृष्टीने वाढणारी जनसंख्या हा एक मोठा प्रश्न आहे, त्यामुळे आता याविषयी कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. असेही ते यावेळी म्हणाले.
कोरोनाच्या काळात जनसंख्येच्या अधिकतेमुळे अनेक प्रश्न आपण अनुभवले आहेत. अधिक जनसंख्या म्हणून कोरोनाचा अधिक प्रसार आणि त्यामुळे वाढणाऱ्या समस्या, मोठ्या प्रमाणात होणारे मृत्यु, सुविधांची कमतरता या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर आपण आणखीनच अनुभवली आहे. त्यामुळे संपूर्ण देशात आता जनसंख्या नियंत्रणासाठी पावले उचलली गेली पाहिजे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
नुकतेच उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी जनसंख्या नियंत्रणासाठी नवीन कायदा लागू केला आहे, ज्यानुसार दोन हुन अधिक संतति असलेल्या लोकांना / त्यांच्या मुलांना सरकारी सुविधा, सरकारी नोकरी आणि स्थानिय निवडणूकीत सहभागी होण्यास बंदी असणार आहे. या एका निर्णयावरून सध्या खूप चर्चा होत आहे, आणि संपूर्ण देशात असा कायदा लागू करावा असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
