समोर तीन पक्ष असताना ही आमची ताकद वाढतेय : देवेंद्र फडणवीस



आमच्या समोर तीन पक्ष असताना देखील आमची ताकद दिवसेंदिवस वाढतेय आणि या तीनही पक्षांची ताकद कमी होतेय, असे वक्तव्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले, एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना ते बोलत होते. त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, “आमचा विचार दूरदर्शी आहे, आणि भविष्यासाठी कार्यरत आहोत. देगलुर येथे आमच्या उमेदवाराला २०१४ साली जिथे २० हजार मतं मिळणेही शक्त नव्हते तिथे आज आम्हाला ८० हजार मते आहेत. पंढरपूर येथे आम्ही जिंकलेलो आहोत. त्यामुळे आमची ताकद वाढतेय आणि या तीनही पक्षांची ताकद कमी होतेय” असे ते यावेळी म्हणाले.

२०२४ मध्ये आम्ही स्वबळावर जिंकून येऊ : फडणवीस यांचा विश्वास


यावेळी मुलाखत देताना ते म्हणाले कि, “आम्हाला पूर्ण विश्वास आहे कि, २०२४ साली आम्ही स्वबळावर पूर्ण मतांनी जिंकून येऊ आणि सरकार स्थापन करू. समोर तीन पक्ष असले तरीही.”



आम्ही कोणाशीही युती करणार नाही” :

“आम्ही कोणाही सोबत युती करणार नाही, सरकार स्वबळावर स्थापन करू. मनसेसोबत युती करण्याचा आमचा कुठलाही मानस नाही. राज ठाकरे यांच्याकडे मला जेवणासाठी आमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्या नवीन घराप्रीत्यर्थ मला त्यांच्या घरी जेवणासाठी बोलवण्यात आले होते, याचा संबंध कुठेही युतीसोबत नाही.” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आता लगेच जर निवडणूका झाल्या तर भाजप कुठे असेल असा प्रश्न विचारता फडणवीस म्हणाले कि, “नंबर १चा पक्ष आम्हीच आहोत, आणि आम्हीच राहणार.” एकूणच फडणवीस यांचा विश्वास बघता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काय होतं, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.