
महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव घेतले कि डोळ्यांसमोर येतं ते मनसुख हिरेन प्रकरण आणि त्यातून पुढए आलेले १०० कोटी वसूली प्रकरण. आणि त्याच प्रकरणांतर्गत अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्यांनी अनिल देशमुख यांच्या पत्नीच्या असलेल्या मालमत्तेबाबत कुठलाही निर्णय देऊ नये अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. या याचिकेवर मध्यस्थ याचिका दाखल करत ईडी ने न्यायालयाकडे मागणी केली आहे कि, “आमची बाजू ऐकल्याशिवाय कुठलाही निर्णय देऊ नका” |
अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली कि त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तेविषयी कुठलीही कारवाई केली जाऊ नये किंवा कुठलाही निर्णय दिला जाऊ नये. मात्र ईडीने त्यावर मध्यस्थ याचिका दाखल करत, ईडीचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घ्यावे मग त्यानुसारच आपला निर्णय द्यावा त्याआधी निर्णय देऊ नये अशी मागणी केली आहे.
एकूणच अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परमबीर सिंहांनी केलेल्या पत्रस्फोटानंतर अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली, आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यानंतर भ्रष्टाचार संबंधी प्रकरणात त्यांच्यावर तपास आणि कारवाई सुरु आहे. एकूणच या विषयात पुढे काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण वाढत असताना, जनतेच्या हितासाठी सरकारने कार्य करणे अपेक्षित आहे, त्यामुळे आता भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकलेलं हे सरकार जनतेच्या कल्याणासाठी काम करतं का, आणि जनतेच्या भावना लक्षात घेतं का? हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.
