आपला प्रजासत्ताक दिन चिरायू होवो…!


आज देशाचा ७३वा प्रजासत्ताक दिन आहे. आजच्या दिवशी दिल्ली येथील राजपथावर मोठ्या थाटात परेड काढण्यात आली आणि संपूर्ण देशाने आपापल्या घरून दूरदर्शनवर या कार्यक्रमाचा आनंद घेतला. आणि सगळ्यांनीच आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिन, चिरायु होवो हीच प्रार्थना केली. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अतिशय सुरेख पार पडला. या कार्यक्रमात मुख्य आकर्षण म्हणजे, विविध झाक्या आणि शेवटचा फ्लायपास, यासाठी नागरिकांची अक्षरश: गर्दी राजपथावर दिसून आली.

कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण ‘फ्लायपास’ :

या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं शेवटचा ‘फ्लायपास’ वायुसेनेच्या या फ्लायपासमुळे अक्षरश: अंगावर शहारा आला. वायूदलाच्या 75 लढाऊ विमानांनी नेत्रदीपक कसरती करत उपस्थितांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. या फ्लायपास्टची सुरुवात हेलिकॉप्टर्सच्या कसरतींनी झाली. सुरुवातीला सारंग हेलिकॉप्टर्सनी शिस्तबद्ध हवाई संचलन करत आकाशात तिरंगा ध्वज तयार केला. त्यानंतर एएलएच, अपाचे , चिनूक, एमआय-17 आणि एमआय 35 या हेलिकॉप्टर्सनी चित्तथरारक कसरती केल्या. त्यानंतर 1971च्या युद्धाच्या आठवणी जागवण्यासाठी भरारी घेतली ती डकोटा विमानांनी. या व्हिटेज विमानांचं 1971 च्या युद्धात मोठं योगदान राहिलेलं आहे. त्यानंतर तीन हरक्यूलिस विमानांनी उपस्थितांना श्वास रोखायला लावला. त्यानंतर सूपरसॉनिक वेगात आलेल्या सुखोई, मिग, राफेल, जग्वॉर या विमानांनी वेगवेगळे फॉर्मेशन्स करत उपस्थितांना श्वास रोखून धरायला भाग पाडलं. या फ्लाय पास्टची सांगता जॉग्वॉर विमानांच्या कसरतींनी पार पडली. बालाकोट उध्वस्त करणाऱ्या जॅग्वॉर विमानांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आकाशात 75 चा आकडा तयार करून अनोखी सलामी दिली.



एकूणच नेत्रदीपक कार्यक्रम झाला, आणि प्रत्येकाने आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या दीर्घायूची प्रार्थना केली.

कार्यक्रमाचा शेवट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला अभिवादन करत केला, आणि आजचा हा ७३ वा प्रजासत्ताक दिन संपन्न झाला.