
काल राजपथावर प्रजासत्ताक दिनाची परेड खूप थाटामाटात पार पडली. सगळीकडे आनंद होता, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचा सोहळा या ७३ व्या प्रजासत्ताक दिनात दिसून येत होता. विविध झाक्या होत्या. सांस्कृतिक कार्यक्रम होते, संपूर्ण परेड दिमाखात पार पडली. मात्र एका दृश्याने सगळ्यांचे लक्ष्य आपल्याकडे वेधून घेतले. सगळ्यांना भावुक केले. तो क्षण होता, पंतप्रधानांनी ‘विराट’ या घोड्यासोबत घालवलेला क्षण.
राष्ट्रपतींच्या सुरक्षेत एक महत्वाची भूमिका अश्वदलाची देखील असते. या अश्वदलातील एक घोडा ‘विराट’ या वर्षी सेवानिवृत्त होणार आहे. प्रजासत्ताक दिनाची ही परेड त्याच्या आयुष्याची शेवटची परेड असे, ज्यात तो प्रत्यक्ष रुपाने सहभागी झाला. आणि अशा या महत्वपूर्ण ‘विराट’च्या सेवानिवृत्तीनिमित्त त्याला सन्मान देण्यासाठी पंतप्रधान खास त्याला भेटायला गेले. त्यांनी त्याचे लाड केले, त्याच्याशी मूक भाषेतच एक संवाद साधला. असं वाटत होतं, कि पंतप्रधान त्याचे आभार मानताएत, त्याला म्हणताएत, “धन्यवाद विराट, देशाच्या आणि राष्ट्रपतींच्या सुरक्षेत इतक सेना आणि आपल्या वीर जवानांइतकाच तू आमच्यासाठी महत्वाचा आहेस. तुझी आम्हाला नक्कीच आठवण येईल.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या कृतिने संपूर्ण भारताचे हृदय जिंकून घेतले. त्या एका क्षणाने सर्व भारतीयांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. पंतप्रधान मोदींनी विराटला जवळ घेऊन त्याचे केलेले कौतुक, त्याला दिलेला सन्मान, त्याचे मानलेले आभार भारतीय संस्कृतिचे प्रतीक आहेत. त्यांची ही कृति सिद्ध करते कि आमच्यासाठी केवळ माणूसच नाही, तर मूक जनावर देखील तितकेच महत्वाचे असतात. वसुधैव कुटुंबकम मध्ये यांचा देखील समावेश आहे, आणि आमच्यासाठी यांचे देखील तितकेच महत्व आहे.
असं म्हणतात या मूक जनावरांना माणसांपेक्षा अधिक भावना असतात. त्या ‘विराट’ला सुद्धा गहिवरून आलं असेल, आणि मनोमन त्याने देखील देवाचे आभार मानले असतील. अशा देशात त्याला अस्तित्व दिल्याबद्दल आणि या राष्ट्रपतींच्या सुरक्षेचा एक महत्वपूर्ण भाग म्हणून त्याला संधी मिळाल्याबद्दल.
या क्षणांना अनेक मीडिया कॅमेऱ्यांने कैद करून घेतले. मात्र हा क्षण सर्व भारतीयांच्या मनावर खोलपर्यंत कोरला गेला आहे, हे मात्र खरं.
