शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये धर्म कुठून आला?


गेल्या दोन दिवसांपासून देशात एका विषयावर मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसून येत आहे. त म्हणजे कर्नाटकातील एका शाळेतील मुस्लिम मुलींनी हिजाब घालायची मागणी करणे | त्या विरोधात काही मुलांनी भगवे गमछे घालून आपला निषेध व्यक्त केला. आता प्रश्न इथे असा उभा राहतो कि शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये धर्म हा कुठून आला ?

शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश याच्यासाठीच दिल्याजातो कि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो. कुणालाही लक्षात येणार नाही कि समोरच्या विद्यार्थी / विद्यार्थिनी कुठल्या धर्माची, जातीची किंवा कुठल्या आर्थिक पातळीची आहे ? सर्व विद्यार्थी एकाच स्तराचे आहेत, विद्यार्थ्यांमध्ये कसलाही भेदभाव नाही, यासाठीच या गणवेशांचा निर्माण करण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा भेदभाव असू नये. मात्र आज विद्यार्थ्यांच्या मनात इतक्या मोठ्या प्रमाणात विष असलेलं बघून मोठ्या प्रमाणात दु:ख होतं.



या सर्वात पाकिस्तानी लेखिका आणि नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफजई हिचे वक्तव्य देखील मोठ्या चर्चेत आहे. मलालाने वक्तव्य केले कि, “मुलींना हिजाब घालून शाळेत न जाऊ देणं हे भयावह आहे” मात्र हिच मलाला जेव्हा स्वत:च्या पुस्तकात ‘मला हिजाब कधीच घालावं लागलं नाही, आणि या बाबतीत मी किती भाग्यवान आहे.” असं मत व्यक्त केलं, तसेच ऑक्सफर्ड युनिवर्सिटी मध्ये देखील तिने स्वत: कधी इस्लामिक कपडे घातले नाही, असे असताना तिचे हे वक्तव्य समाजाला खटकते आहे, आणि त्यावरुन चर्चेचे वादळ उठले आहे.

एकूणच देशात शालेय विद्यार्थ्यांना हिजाब घालावे कि नाही, एखादा धार्मिक पोशाक घालावा कि नाही, यावर चर्चा होणे अतिशय दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण लक्ष्य हे अभ्यासात, आणि उत्तम भविष्यात असावे, मात्र आता तसे दिसून येत नाही, धार्मिक क्लेश हे कमित कमी विद्यार्थ्यांमध्ये तरी असू नये.

आता या चर्चेचे पुढे काय होते, हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.