पुण्यात दिवस रात्र काम करत मेट्रो उभारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची नोंद ही घेतलीच गेली पाहिजे आणि आणि त्यानिमित्त त्यांचे कौतुक हे झालेच पाहिजे, या उद्येशाने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मेट्रो कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी पुष्पवृष्टि करत मेट्रो कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी अतुल गाडगीळ आणि इतर अभियंतेही उपस्थित होते. गिरीश खत्री मित्रपरिवाराच्या मदतीने हा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना ओळीने बसवून त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. एकूणच पुणे मेट्रोचे काम जलद गतीने झाले आणि यामध्ये तेथील कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे. दिवस रात्र मेहनतीने काम करत त्यांनी मेट्रोचे काम पूर्ण केले, आणि त्यानिमित्त त्यांचे कौतुत करण्यात यावे यासाठी भाजपतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मेट्रो कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमामुळे भरून आले. आणि त्यांनी कार्यक्रम झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जय महाराष्ट्र आणि जय शिवाजीच्या घोषणा केल्या. एकूणच हा कार्यक्रम मेट्रो कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारा कार्यक्रम सिद्ध झाला. अशा कार्यक्रमांमधून कर्मचाऱ्यांना पाठबळ मिळते, आणि पुढे ते आणखी जोमाने काम करू शकतात, हे स्पष्ट झाले.
