
महाराष्ट्राच्या राजकारणात दर दिवशी काही ना काही घडत असते. असे असताना आता पुन्हा सरकार आणि विरोधी पक्ष पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. आज शिवसेनेतर्फे संजय राऊत यांनी ‘राष्ट्रपति राजवट लागू करून विरोधीपक्ष आमच्या वर सूड उगवत आहे, असे विधान केले. तर दुसरीकडे सरकारची तानाशाही का चालवून घ्यायची असा सवाल राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “ज्या प्रकारे मागच्यावेळी सभागृहात चर्चा चालू असताना, ती चर्चा थांबवून विधेयक पास करण्यात आले, तर ही तानाशाही का चालवून घ्यायची?” असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
“आम्ही सरकारला सांगितले तुम्हाला विरोधकांची गरज नसेल तर तुम्ही का आम्हाला निमंत्रित करता? या संबंधी अतिशय तीव्र भावना आम्ही व्यक्त केल्या आहेत. आणि अध्यक्षांनी आम्हाला आश्वासन दिले आहे, कि मागच्या वेळेला जे झाले ते पुन्हा होणार नाही.” असे देखील ते यावेळी म्हणाले.
एकूणच आजची शिवसेनेची पत्रकार परिषद आणि विरोधी पक्षाची विधाने यामुळे राज्याच्या राजकारणात गदारोळ झाला आहे. फडणवीस यांनी “सरकार विदर्भासोबत अन्याय करते आहे.” असा आरोप देखील यावेळी केला आहे. तर दुसरीकडे “केंद्र सरकार ईडी यंत्रणेचा चुकीचा वापर करत आहे, तसेच महाराष्ट्र काही गांधींची औलाद नाही.” अशी खळबळजनक विधाने संजय राऊत यांनी केली आहे.
दोन वेगवेगळ्या विषयांवरुन सरकार आणि विरोधीपक्ष पेटून उठले आहे. त्यामुळे या संदर्भात पुढे काय होते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. तसेच आजच्या संजय राऊत यांच्या विधानांवर त्यांना योग्य त्या वेळी योग्य ते उत्तर दिले जाईल, असे विधान फडणवीस यांनी केले आहे.
