महाविकास आघाडीने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या…! : फडणवीस



“महाविकास आघाडीने क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. नवनीत राणा यांना जी वागणूक देण्यात आली आहे, ती वागणूक आपण एका क्रिमिनलला देखील देत नाही. अतिशय भयंकर असे त्यांना वागवण्यात आले आहे.” असे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.

खासदार नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लीलावती रुग्णालयात जाऊन राणा यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी वरील वक्तव्य केले.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पति आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारण केवळ एवढेच होते कि त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर म्हणजेच मातोश्री समोर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा निर्णय घेतला. केवळ या एका कारणावरुन त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला, यावरुन विरोधी पक्षाने चांगलाच निषेध केला आणि हे सरकार किती क्रूर आहे, असे वक्तव्य केले आहे.



त्यानंतर नवनीत राणा यांना तुरुंगात व्यवस्थित वागणूक देण्यात आली नाही, असे देखील समोर आले होते. आता राणा दंपती यांची सुटका झाली असून सध्या वर्टिगोमुळे नवनीत राणा रुग्णालयात दाखल आहेत. राणा दंपती ज्या वेळेला रुग्णालयात भेटले त्यावेळचा त्यांचा व्हिडियो देखील व्हायरल झाला.

एकूणच सरकारने राणा दंपती यांचा हेतूपुरस्सर छळ केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पुढे काय होते हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.