उत्तर प्रदेशातील लोकांसाठी मुंबईत सरकारी कार्यालयाची स्थापना होणार : योगी आदित्यनाथ



मुंबई येथे उत्तरप्रदेश सरकारचे कार्यालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. महाराष्ट्र, त्यातूनही मुंबई उत्तरप्रदेशातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि मजुरांसाठी असेलेले एक मोठे रोजगाराचे स्थान आहे. मुंबई येथे उत्तरप्रदेशातून येणारे अधिकांश मजुर काम करतात. लॉकडाउनच्या काळात या मजुरांचे भरपूर प्रमाणात हाल झाले. त्यांना वाहतूकीचे साधन उपलब्ध झाले नाहीत, आणि रोजगारही गेले. अशा परिस्थितीत आपल्या राज्यातील नागरिकांची काळजी घेण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारने मुंबई येथे एक सरकारी कार्यालय सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे.

हे कार्यालय सुरु करण्यामागे काय उद्येश्य होता असे विचारल्यास उत्तरप्रदेश सरकारने स्पष्ट केले कि, “’करोना काळात लाखो मजुरांना महाराष्ट्रासह इतर राज्यातून उत्तर प्रदेशात परत यावं लागलं होतं. या पार्श्वभूमीवर सरकारने विचारने विचार केला की, उत्तर प्रदेशातून कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांच्या मदतीसाठी विविध राज्यांमध्ये आपलं कार्यालय असायला हवं. जेणेकरून त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेता येईल. तसंच संकटाच्या काळात लोकांना सुरक्षितपणे उत्तर प्रदेशात नेणं शक्य होईल आणि त्यांच्या कौशल्यनुसार येथेच त्यांना रोजगार उपलब्ध करून देता येईल,’ असं उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने स्पष्ट केलं आहे.”

मुंबईत विविध उद्योग धंध्यांच्या उभारणीपासून ते चित्रपट सृष्टीपर्यंत उत्तरप्रदेशातील मजुरांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे ही उत्तरप्रदेश सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे या कार्यालयाची स्थापना करण्यात येत आहे. असेही उत्तरप्रदेश सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबईत परप्रांतीयांचा प्रश्न अनेकदा मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय बनला आहे. असे असताना उत्तरप्रदेश सरकारच्या या निर्णयाला राजकीय वर्तुळातून काय प्रतिसाद मिळतो हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे.