
ब्राझीलच्या कॅसियस दो सूल या शहरात सुरु असलेल्या 24 व्या मूकबधील ऑलेम्पिकमध्ये (Deaflympics) स्पर्धेत भारताने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. टेनिस पुरुष दुहेरी स्पर्धेत धनंजय दुबे आणि पृथ्वी शेखर या जोडीने रौप्य पदकाची कमाई करत भारताचे नाव जागतिक पटलावर उंचावले आहे.
अंतिम सामन्यात फ्रान्सच्या मिकेल लॉरेन्ट आणि विनसेंट नोवेली यांनी भारताच्या धनंजय-पृथ्वी जोडीला मात दिली असल्याने भारत सुवर्णपदक मिळवू शकला नाही. अंतिम सामन्यात फ्रान्सने 6-7 आणि 2-6 च्या फरकाने भारताला मात दिली आहे. त्याआधी सेमीफायनलच्या स्पर्धेत भारतीय जोडीने अर्जेंटिनाच्या मेटियो गॉबी आणि निकोलस लॅहीटे यांना 6-4 आणि 6-0 च्या फरकाने मात दिली होती.
https://www.kooapp.com/koo/YASMinistry/32b2e16c-b9de-47df-b446-6b96e5b05410
भारताची मूकबधीर ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी
भारताची गोल्फर दीक्षा डागरने गुरुवारी सुवर्णपदक जिंकलं. त्यापूर्वी याच मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटन खेळात देखील सुवर्णपदक मिळवलं. भारतीय संघाने जपानच्या खेळाडूंना फायनलमध्ये 3-1 ने मात देत हे सुवर्णपदक मिळवलं. तसंच धनुष श्रीकांतने 10 मीटर एअर रायफल शूटींग स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं असून शौर्य सैनीने कांस्य पदकावर नाव कोरलं आहे. मूकबधीर ऑलिम्पिक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी 10 मीटर एअर रायफल शूटिंग स्पर्धेत आठ खेळाडूंमध्ये फायनल सामना खेळवला गेला होता.
