आणि केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी वाचवला कॅमेरामॅनचा जीव…!


एक डॉक्टर हा कुठल्याही क्षेत्रात पुढे का न असो, पण तो सदैव एक देवदूत असतो. कठीण प्रसंगी जीव वाचवण्याचे काम हे डॉक्टर्स करत असतात, आणि म्हणूनच त्यांना देवदूत म्हटले जाते. असाच एक प्रसंग नुकताच घडला. केंद्रय मंत्री डॉ. भागवत कराड यांची एका कार्यक्रमादरम्यान मुलाखत सुरु होती. त्या मुलाखातीच्या मध्येच कॅमेरामॅन अचानक चक्कर येऊन पडला. यावेळी केंद्रीय मंत्री कराड यांनी स्वत: डॉक्टर असल्याने आपली जबाबदारी पार पाडत या कॅमरामॅनचा जीव वाचवला.



कदाचित कामाच्या ताणामुळे, गरमी मुळे किंवा इतर कुठल्या कारणामुळे त्याला चक्कर आली असावी, मात्र सगळं अचानक घडल्यामुळे कुणालाच सुधरले नाही काय करावे. अशा परिस्थितीत डॉ. कराड यांनी समोर येत आपल्या डॉक्टरकीचा योग्य तो उपयोग करत या माणसाचा जीव वाचवला. ज्याच्या व्हिडियो व्हायरल होत आहे.



राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील डॉ. कराड यांची प्रशंसा करत, त्यांचा व्हिडियो शेअर केला आहे. ते म्हणलात, “यासाठीच डॉक्टर्स यांना देवदूत म्हटले जाते. हा व्हिडियो बघा..!” असे म्हणत त्यांनी व्हिडियो शेअर केला आहे.

एकूणच आज इंटरनेट वर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडियोज पैकी हा एक अतिशय सकारात्मक असा व्हिडियो आहे. नक्की बघा.