राज्यातील पोलिसांना घर देण्यासाठी विशेष बैठक, मुख्यमंत्री तातडीने पावले उचलणार…!



राज्यातील पोलिसांच्या घराविषयीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर पोलिसांना भेडसावत होता. बोरीवली येथील वसाहतीतील धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या पोलिसांची व्यथा मख्यमंत्री एकनाथ खडसे यांनी स्वत: तिथे जाऊन समजून घेतली, आणि त्यानंतर या प्रश्नाला त्वरित सोडवायचा त्यांनी निश्यच केला आहे. तसेच या संबंधित सर्वंकष आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

“पोलीसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणे ही युती सरकारची प्राथमिकता असून त्यासाठी शॉर्ट टर्म, मिडीयम टर्म आणि लॉंग टर्म असे तीन टप्यात काम नियोजन करण्यात यावे असे सुचित केले. हा आराखडा तयार करताना भाडेतत्त्वावर (रेंटल बेसीस), शहरी कमाल जमीन धारणा कायद्याच्या अंतर्गत येणारे तसेच इतर पोलीस गृहनिर्माण प्रकल्पात आरक्षित भूखंड आणि एसटी महामंडळाचे भूखंड विकसित करण्याच्या पर्यायाचा विचार व्हावा अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.” असे देखील शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.



पोलिसांच्या घरांची व्यवस्था करणे हे सरकारचे पुढील महत्वाचे काम आहे, आणि यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही सज्ज झालेले दिसून येत आहे. या घरांसंबंधी कामाचे पुढे काय होणार हे बघणे आता महत्वाचे ठरणार आहे.