फडणवीस-शिंदे सरकारकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड!

मुख्यमंत्र्यांकडून भूविकास बँकेच्या थकबाकीदारांची कर्जमाफी :


मुंबई : यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असून गुरुवारी ता. २० रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसंदर्भात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे. जवळपास ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफीकरण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गृह, महसूल, पणन, उच्च व तंत्र शिक्षण ते वैद्यकीय अशा वेगवेगळ्या विभागांसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यावेळी अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येऊन अनेक निर्णय घेण्यात आले. त्यापैकीच एक म्हणजे शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. भूविकास बँकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून जवळपास ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात येईल तसेच भू-विकास बँकेच्या मालमत्तांचे शासनाकडे हस्तांतरण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन मित्र स्थापन करण्यात येणार आहे. याद्वारे शासनाला दर्जेदार सल्ला आणि धोरणात्मक मार्गदर्शन मिळणार आहे.