पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे वादग्रस्त वक्तव्य , काँग्रेसच्या विकृत नेत्याला अटक

भोपळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचे वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेस नेते राजा पटेरिया यांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील दमोह येथील हट्टा येथून आज पहाटे 5.30 वाजता राजा पटेरिया यांना पोलिसांनी अटक केली.

काँग्रेसचे माजी मंत्री असलेल्या राज पटेरिया यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पटेरिया रविवारी पन्ना येथील काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, मोदी निवडणुका संपवतील, मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे जीव धोक्यात आहेत.

संविधान वाचवायचे असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहायला हवे. या वक्तव्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला. राजा पटेरिया यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यांना मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली आहे.