नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशात चीनने पुन्हा एकदा सैन्य संघर्ष सुरू केला आहे. भारतीय जवानांनी शौर्याने चीनला माघारी पाठविले. पण चीनची मग्रुरी कमी होत नाही. चीनला जगाचीही भीती वाटत नाही कारण कारण संयुक्त राष्ट्रसंघाचे सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व चीनकडे आहे. आपल्या विरोधात आलेल्या कोणत्याही प्रस्तावास चीन व्हेटो (नकाराधिकार) वापरून रोखू शकते. जवाहरलाल नेहरू यांच्या एका चुकीमुळे चीनच्या घशात सुरक्षा परिषद सदस्यपद गेले.

स्वातंत्र्यावर भारताला सुरक्षा परिषद सदस्यपद मिळत असूनही नेहरूंनी ते चीनच्या घशात घातले. ते आता चांगलेच महागात पडत असून हाच चीन सध्या भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ही जगातील सर्वात मोठी व सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. ही परिषद हे संयुक्त राष्ट्रसंघाचे एक मुख्य अंग आहे. या सुरक्षा परिषदेत एकूण १५ सभासद राष्ट्रे असतात. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया व चीन ही पाच राष्ट्रे सुरक्षा परिषदेची स्थायी सभासद आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेची देखभाल करण्याची प्राथमिक जबाबदारी सुरक्षा परिषदेची आहे. जगात युद्ध, हिंसाचार थांबवून शांतता प्रस्थापित करण्यात सुरक्षा परिषद पुढाकार घेते. काही प्रकरणांमध्ये, सुरक्षा परिषद आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा राखण्यासाठी आर्थिक निर्बंध लादण्याचा किंवा बळाचा वापर करण्याचा निर्णय घेऊ शकते.
नेहरू स्वतःला जागतिक नेते समजायचे. आपल्या वेगळ्याच वैचारिक विश्वात जगत होते, वेगळ्याच स्वप्नात मश्गुल असल्यामुळे त्यांनी चीनला सुरक्षा समिती पद देण्याचा आग्रह धरला.
आंतरराष्ट्रीय राजकारणात सोवियत रशियाच्या कम्युनिस्ट राजकारणाला शह द्यायला म्हणून चीनचे सुरक्षा समिती मधील पद काढून घेऊन ती जागा भारताला द्यायचा विचार अमेरिकन राजकारण्यांमध्ये समोर आला. त्या मुळेच आपल्या परराष्ट्र सचिवा मार्फत तसा प्रस्ताव अमेरिकेने भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना पाठवला पण जवाहरलाल नेहरू यांनी नैतिकतेचा हवाला देत हे पद भारताला देण्यापेक्षा चीनच्या मुख्य भूमीवर राज्य करत असलेल्या कम्युनिस्ट पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाला ही जागा देण्यात यावी असा पवित्रा घेतला. हाताशी आलेला हा संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा समिती मधील स्थायी सदस्यांच्या पदाला, त्या व्होटोच्या अधिकाराला नाकारले.
जागतिक पातळीवर चीनची दादागिरी त्यामुळे वाढली. भारतालाही त्याचा फटका बसला. अगदी नेहरूंच्या कारकीर्दीत चीनने भारतावर आक्रमण केले. भारताची हजारो किलोमीटरची भूमि बळकावली. याविरुद्ध संयुक्त राष्ट्रसंघात जाण्याची सोयही भारताला राहिली नाही. नेहरूंनी उभा केलेला नरराक्षस आजही भारताला त्रास देत आहे.
