गडचिरोली जिल्हा म्हटलं की नजरेसमोर येतो तो नक्षलवाद परंतु हाच नक्षलवाद संपून तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले असून या निर्णयाद्वारे तेथील युवकांना रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागडचा प्रकल्प हा एक महत्त्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे परंतु नक्षलवादी चळवळीतील काही लोक जाणीवपूर्वक लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत सुरजागडच्या या प्रकल्पामुळे सुरजागडच्या देवीच्या मंदिरातील परिसर मायनिंग द्वारे उडवला जाऊ शकतो अशी नागरिकांमध्ये भीती पसरवताना आहेत. असं काहीही होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.
याचबरोबर कोणसरीमध्ये पहिल्यांदाच स्टील प्लांट ला सुरुवात केली लवकरच ह्या पहिल्या फेजला सुरुवात होणार आहे. याच्यामुळे या कंपनीने अजून वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तिथे करण्याचे ठरविले आहे. यामुळे गडचिरोली चे चित्र बदलू शकतो सुरुवातीच्या काळामध्ये लोकांची दिशाभूल झाली होती पण आता तिथली जनता ही याच समर्थन करत आहे. कारण याच प्लांटमुळे तेथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे.तेथील ट्रक वाहतूक वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना तेथील स्थानिक नागरिकांना करावा लागतो याच्यावर पर्याय म्हणून लवकरच दुसरा रस्ता होणार असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
नक्षलवाद्यांना घाबरून महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र मध्ये गडचिरोली जिल्ह्यातून नक्षलवाद संपवू असे यावेळी फडणवीस बोलताना म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील तरुण नक्षलदलम मध्ये सामील होत नाहीत नक्षलदलम या संघटनांना आता छत्तीसगड आणि उडीसा मधून तरुण आणावे लागत आहेत. याचबरोबर आपल्याला आवश्यक तो संघर्ष करावा लागला तरी तिथलं औद्योगीकरण आपण केलं पाहिजे या औद्योगिकीकरणामुळे सुरुवातीला तेथील 6000 स्थानिकांना रोजगार निर्माण होणार आहे. या ठिकाणी गुंतवणूक झाली पाहिजे स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे यामुळेच नक्षलवाद संपेल असं यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
