राज्यातील सर्व प्रवर्गातील भरतीसाठी आता डोमेसाईल प्रमाणपत्र अनिवार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील सर्व प्रवर्गातील भरतीसाठी आता डोमेसाईल प्रमाणपत्र अनिवार्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सामाजिक आणि समांतर आरक्षणाकरिता डोमेसाईल मागितलं होतं पण इतरांकरता डोमेसाईल मागितलं नव्हतं. ज्यावेळेस ही बाब आमच्या लक्षात आणून दिली त्यावेळेस माहिती घेतली असता असं लक्षात आलं की 10-7- 2008 रोजी महाराष्ट्र सरकारने परिपत्रक काढल आहे. महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पदांवर नियुक्ती देण्यासंदर्भात सर्व नियुक्ती प्राधिकार्‍यांना सुचित करण्यात येते की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 309 खालील परंतु का अनुवये प्रधान केलेल्या प्रादीकरानुसार तयार करण्यात आलेल्या सेवा प्रवेश नियमांच्या प्रारूपामध्ये महाराष्ट्र राज्यात किमान वास्तव्याची अट अंतर्भूत करण्यात आलेली नाही.

तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये अशा प्रकारची अट विहित केलेली नसते. यापूर्वीची भरती पाहिली असता हे नियम 1961 साली तयार केले आहेत. पण कधीच या संदर्भात त्यामध्ये डोमेसाईल ची अट नव्हती. जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी जाहिरात निघाल्या त्यातही डोमेसाईलची अट नव्हती. तरी यापूर्वी अशा प्रकारची भरती झाली असेल तर ती भरती योग्य नाही. महाराष्ट्राच्या तरुणांना यामध्ये संधी मिळाली पाहिजे म्हणून त्यासंदर्भात निर्णय घेऊन 5 -12- 2022 रोजी यात सुधारणा करून सहाय्यक अभियंता व कनिष्ठ अभियंता या पदांच्या सरळ सेवा जाहिरात अन्वये जी भरती आहे यामध्ये सर्व प्रवर्गांना आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल हे अनिवार्य केले. याच बरोबर सेवा प्रवेश नियमांमध्ये ही बदल करून डोमेसाईल महाराष्ट्रात अनिवार्य होणार आहोत त्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणांना त्याच्या मध्ये न्याय मिळेल असं देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले.