मुंबई : औरंगजेबाचे गुणगान करणारे जितेंद्र आव्हाड लष्करे ताेय्यबाची हस्तक इशरत जहाँ प्रकरणातही ताेंडावर
पडले हाेते. गुजरातमध्ये चकमकीत मारल्या गेलेल्या मुंब्रा येथील इशरत जहाँवरून आव्हाड यांनी राजकारण पेटविले हाेते. तिच्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली हाेती. मात्र, त्यानंतर इशरत जहाॅंचा दहशतवादी असल्याचा खरा चेहरा डेव्हिड हेडलीच्या साक्षीतून समोर आला हाेता.
मुंब्रा मतदारसंघातील जातीय गणित लक्षात घेऊन मुस्लिम तृष्टीकरणासाठी काेणत्याही स्तरावर जाण्याची जितेंद्र आव्हाड यांची तयारी असते. त्यामुळेच औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा नव्हता. असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं अशी मुक्ताफळे आव्हाड यांनी उधळली. त्यावर टीका झाल्यावर सारवासारव करताना आव्हाड चांगलेच ताेंडावर पडले हाेते.
आव्हाड यांचे ताेंडावर पडणे पहिले नाही. अहमदाबाद येथे पोलीस चकमकीत इशरत जहाँ मारली गेली हाेती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र माेदी आणि अमित शहा यांना बदनाम करण्यासाठी आव्हाड यांनी राजकारण पेटविले. इशरतला निर्दोष ठरवत तिच्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला.आव्हाड यांनी त्यावेळी इशरतच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतही केली. मात्र, त्यानंतर मुंबई हल्यातील एक मास्टरमाईंड डेव्हिड हेडलीची साक्ष समाेर आली. इशरत ही लष्कर-ए-तोयबाची हस्तक होती. इतकेच नव्हे तर ती सुसाइड बॉम्बर होती, असा धक्कादायक खुलासा हेडलीने केला. यानंतर या प्रकरणात इशरत निर्दोष असल्याचे ठामपणे सांगणारे आव्हाड चांगलेच ताेंडावर पडले.
