राज्यपाल, चंद्रकांत पाटील व इतर भाजप नेत्यांच्या वक्तव्याचा अर्थ काढून त्याच्यावर राजकारण करणारे राष्ट्रवादीचे नेते आता मात्र अजित पवार यांच्या वरून मूक गिळून गप्प आहेत. भिडे एका महिला पत्रकाराला फक्त टिकली लावण्यास सांगितल्यामुळे महिलांची होणारी गळचेपी मनुवादीवादी विचार अशा वल्गना राष्ट्रवादीतील महिला नेत्यांनी केल्या परंतु सुप्रिया सुळे यांनी त्याचं महिला पत्रकारांना साडी घालावी असे बोलल्यावर सर्व महिला नेत्या गप्प हाच दुटप्पीपणा राष्ट्रवादी नेहमी करत आलं आहे.
राष्ट्रवादी व महाविकास आघाडीतील नेत्यांनी नेहमी महापुरुषांचा वापर हा राजकारणासाठी केला आहे. मतांच्या राजकारणासाठी राष्ट्रवादीचे हिरवे विचार नेहमी दिसून आले आहेत. असेच एक राष्ट्रवादीचे नेते म्हणजे जितेंद्र आव्हाड हे नेहमी महापुरुषांचा अवमान करण्यात पुढे असतात. हे स्वतःला इतिहासकार वैगेरे समजतात व आपले विचार माध्यमांपुढे मांडत असतात. अफजलखान हा धर्म वाढवण्यासाठी आला नव्हतं तर तो आपल्या सीमेचं रक्षण करण्यासाठी आला होता अशी अजब माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली यावर त्यावेळी इतर नेत्यांनी एक शब्द देखील काढला नाही याचा समर्थन कदाचित त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्या वेळी केलं असावं . एवढ्यावर हे महाशय थांबले नाहीत तर औरंगजेब हा क्रूर नव्हता तो हिंदू द्वेष्टाही ही नव्हता अशा शब्दात आव्हाडांनी औरंगजेबाचं कौतुक करण्याचा प्रयत्न आव्हाडांनी केला. यावर देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावर देखील मौन बाळगलं आहे. यावरून राष्ट्रवादीची विचारधारा ही हिरवेकरणाची आहे यात शंका नाही.
