नवी दिल्ली : हावर्ड विद्यापीठात शिकलेल्या राहुल गांधी यांचे अर्थशास्त्रातील अज्ञान पुन्हा एकदा उघड झाले आहे. देशातील खादी उद्योग मरतोय असे वक्तव्य राहुल गांधींनी केले आहे. प्रत्यक्षात या उद्योगाची गेल्या वर्षीची उलाढाल 1.15 लाख कोटी रुपये होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी अभिनेता कमल हासन यांच्यासोबतच्या मुलाखतीचा काही भाग शेअर केला.
राहुल गांधी यांनी कमल हसन यांना सांगितले की भारतीय खादी उद्योग मरत आहे. ‘मृत’ खादी उद्योगाला पुनरुज्जीवित करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
https://twitter.com/KirenRijiju/status/1609966085792739328?t=xbl_KLGbEXTsSTOsJ5gC0Q&s=08
कमल हसन यांच्या खादी जॅकेटकडे अंगुलीनिर्देश करत राहुल गांधी यांनी दावा केला की भारतात पुढील खादी जॅकेट पाहायलाही मिळणार नाही. कारण मोदींच्या राजवटीत उद्योग हळुहळु मरत आहे.
मात्र प्रत्यक्षात देशातील खादी उद्योग विक्रमी वेगाने प्रगती करत आहे. 2021-22 मध्ये उद्योगाने 1.15 लाख कोटींची उलाढाल नोंदवली. देशातील बहुतांश कापड उद्योगांपेक्षा खादी उद्योगाची मोठी वाढ झाली आहे.सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME) मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या वर्षी, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) 2021-22 मध्ये 1.15 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली. या उलाढालीमुळे KVIC ही देशातील 1 लाख कोटी रुपयांची उलाढाल करणारी एकमेव कंपनी बनली आहे.एमएसएमई मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठ वर्षांत, खादी क्षेत्रातील उत्पादन 191% वाढले आहे, तर विक्री 332% ने वेगाने वाढली आहे.
KVIC चे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी खादी उद्योगाच्या अभूतपूर्व वाढीचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशात खादीला चालना देण्यासाठी सतत दिलेल्या पाठिंब्याला दिले. नाविन्यपूर्ण योजना, सर्जनशील विपणन कल्पना (innovative marketing strategy) आणि विविध मंत्रालयांचे सक्रिय समर्थन यामुळे खादीच्या विक्रीत वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी ‘मन की बात’ च्या 81 व्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर रोजी खादीची विक्रमी विक्री करण्याचे आवाहन केले होते. व्होकल फॉर लोकल उपक्रमाला चालना देत त्यांनी स्थानिक बाजारातून खादी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले.2 ऑक्टोबर रोजी दिल्लीच्या खादी इंडिया स्टोअरने 2020 मध्ये एकाच दिवसात 1 कोटी रुपयांची विक्री झाल्याचे कौतुक पंतप्रधानांनी केले होते.
कायदा मंत्री किरण रीजिजू यावर म्हणतात की खादीबद्दलच्या मूलभूत गोष्टीही माहीत नसलेल्या दोन व्यक्ती तज्ज्ञांसारख्या प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.मी अटलजींच्या सरकारच्या काळात खादी आयोगाचा सदस्य होतो. मला परिस्थिती माहीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात खादी क्रांती कशी घडवून आणली हे मी पाहिले आहे.
