जितेंद्र आव्हाड यांची धमकी की इशारा ?

महाराष्ट्राचे माझी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ मध्ये ते कायदा हातात घेण्याची भाषा करत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना जितेंद्र आव्हाड हे थेट कायदा हातात घेत होते. अनंत कारमुसे याच अपहरण आणि मारहाण प्रकरण महाराष्ट्र विसरलेला नाही. यापूर्वी आव्हाड हे इशारा न देता थेट कायदाच हातात घेत होते, मारझोड करत होते. आता मात्र, ते विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांनी कदाचित त्यांची कार्यपद्धती बदलली असावी. आव्हाडांनी एक व्हिडिओ मध्ये एका हातात कुराण व एका हातात भगवतगीता घेऊन कायदा हातात घेण्याची भाषा करताना दिसले आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यापासून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत आहे.

        पुढे हे प्रकरण वाढल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी त्या महिलेच्या चारित्र्यावर देखील शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला. मी आणि माझे कार्यकर्ते हातात कायदा घेऊ आधी धमकी त्यांनी दिली हे तेच आव्हाड आहेत जे महाविकास आघाडीच्या काळात मंत्री म्हणून काम करत होते. आव्हाड या व्हिडिओ मधून सरकारला आणि पोलिसांना आव्हान देण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. पोलीस एखाद्या व्यक्तीच्या विरोधात खोटा किंवा चुकीचा एफआयआर दाखल करतात ही शंका नाकारता येत नाही. परंतु, अशा प्रकारच्या घटना झाल्यानंतर संबंधित व्यक्ती माध्यमांसमोर न जाता ती व्यक्ती न्यायालयात धाव घेते, कारण माध्यम तुम्हाला प्रसिद्धी देतात न्याय नाही. न्याय तुम्हाला न्यायालयामध्येच मिळेल . त्यामुळे संबंधित व्यक्ती न्यायालयात जाऊन स्वतःचा बचाव करू शकते. आव्हाड देखील या प्रकरणात न्यायालयात का जात नाहीत हा एक प्रश्न निर्माण होत आहे. 

         ज्या महिलेने जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. त्या महिलेने त्या संबंधीचे व्हिडिओ त्यांनी पोलीसांना दिले आहेत. आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संभंधित महिलेच्या चारित्र्यावर संशय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात कायदा पाळणं हे आव्हाडांच्या स्वभावात नाहीत त्यामुळे त्यांनी आपल्या व्हिडिओ द्वारे कायदा हातात घेण्याची भाषा केली. आपल्यावर कदाचित बलात्काराचा आरोप देखील होईल असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड व त्यांच्या पत्नीने केलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी खरंच काही केलं नसेल  तर त्यांनी न्यायालयात धाव घेतली पाहिजे पण तस ते करताना दिसत नाहीत.