संजय राऊत राज्यात कटुता कोणी वाढवली

२०१९ मध्ये राज्यात अपेक्षित सरकार न येता अपेक्षित नसणार सरकार आलं. शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत सरकार बनवलं. असं बोलले जायचे की, राजकारण बदललं गेल्या ३ वर्षांपासून राजकारणाचा स्थर खाली जाताना दिसतोय याचं महत्वाचं कारण म्हणजे राजकीय व्यक्तींकडून ज्या पद्धतीची भाषा व शब्द वापरले जातायेत व नेत्यांकडूनच होणारी नेत्यांची हिणवणूक हे महत्वाचं कारण आहे. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते कि, राजकारणात वाढलेली कटुता आता कमी झाली पाहिजे संपली पाहिजे आपण त्यासाठी पुढाकार घेणार आहोत.

   देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर संजय राऊत व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी देखील याला समर्थन दिले आहे. कटुता मिटली पाहिजे असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. मुळात ही कटुता मिटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार का घ्यावा? म्हणजे बाकीच्यांनी घाण करावी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मिटवावी अशी अपेक्षा आहे का? मुळात याची सुरुवात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून कटुता वाढण्यास सुरुवात झाली ज्यांच्या विरोधात शिवसेनेनं प्रचार केला त्यांच्याच मांडीला-मांडी लावून ते बसले.परंतु, विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षात अशी भाषा कधी वापरली नाही जी संजय राऊत यांनी वापरली आणि कटुता निर्माण करण्यासाठी किंवा राजकारणाचा स्थर खाली आणण्यासाठी संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद कारणीभूत आहे. संजय राऊत हे विरोधकांवर टीका करताना त्यांनी पातळी सोडून बोलत असतात त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, नेहमी आपल्या कामातून व राजकीय पद्धतीने ते करून दाखवलं. 

         सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील माध्यमांशी बोलताना नेहमी अश्लाघ्य भाषेचा वापर केला. संजय राऊत माध्यमांना सामोरे जाताना कशी भाषा वापरतात. त्यामध्ये शिव्यांचा वापर असतो, अश्लाघ्य भाषेचा वापर असतो हे सगळं संजय राऊत जाणीपूर्वक करताना दिसतात. एकनाथ शिंदे यांच्या सोबत ४० आमदार बाहेर गेल्यावर त्यांच्या विषयी संजय राऊत व त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांच्या विरोधात चुकीची भाषा वापरली. आता जेव्हा काही कार्यकर्ते व पदाधिकारी तुम्हाला सोडून जातायेत. त्यावेळी तुम्ही त्यांना कचरा म्हणतात आणि एकीकडे राजकीय कटुता मिटली पाहिजे असं तुम्ही म्हणतात. मग ही कटुता कोण वाढवतंय हे देखील संजय राऊत यांनी सांगावं. उद्धव ठाकरे यांनी देखील अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीर यष्टीवरून त्यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत पक्षसोडून गेलेल्या व्यक्तींवर तुम्ही कशाप्रकारे टीका करतात कशी भाषा वापरता. याच उत्तर संजय राऊत यांनी द्यावं. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील ही राजकीय कटुता मिटवण्यासाठी प्रयत्न करावेत.