आदित्य ठाकरेंना सामान्य मुंबईकरांपेक्षा रेसकाेर्सच्या चिंतेमागचे गाैडबंगाल!

मुंबई : सामान्य मुंबईकरांना थिम पार्कची भेट देण्याचा प्रयत्न मुंबई महापालिका करत असताना आदित्य ठाकरेंना  रेसकाेर्सच्या जागेची  चिंता लागण्यामागे गाैडबंगाल काय असा प्रश्न विचारला जात आहे. मुंबई महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या या जागेचे लीज संपलेले असल्याने ही जागा परत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र, शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून त्याला विराेध हाेत आहे.

1914 मध्ये महालक्ष्मी रेसकाेर्सची जागा राॅयल वेस्टर्न इंडिया टॅफ क्लबला लीजवर दिली गेली हाेती. 2014 मध्ये या जागेचे लीज संपले आहे. मात्र, ही जागा परत मुंबई महापालिकेला देण्यास शिवसेनेचे तेव्हापासून विराेध आहे. या जागेवर थीम पार्क साकारण्यासाठी संपूर्ण भूखंडा मिळावा, यासाठी मुंबई महापालिका (पुन्हा एकदा राज्य सरकारला  पत्र पाठवणार आहे. . महालक्ष्मी रेसकोर्समधील जागेवर थीम पार्क साकारण्यासाठी रेसकोर्समधील जमिनीची मालकी मुंबई महापालिकेला मिळावी, अशी मागणी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात करण्यात येणार आहे. सुमारे सव्वा दाेनशे एकरची ही जागा आहे. मात्र, या जागेतून महापालिकेला काहीही उत्पन्न मिळत नाही. सामान्य मुंबईकरांना या जागेवर प्रवेशही करता येत नाही. तरीही सामान्य नागरिकांच्या हिरवाई पाहिजे हे कारण दिले जात आहे.

विशेष म्हणजे आता उध्दव ठाकरे गटाचेच असलेले सुनील प्रभु यांनी महापाैर असताना रेसकाेर्सची सव्वा दाेनशे एकर जागा साेडविण्यासाठी महापालिकेतर्फे नाेटीस दिली हाेती. नाेटीसीनंतरही जागा साेडली नाही तर कारवाइ करण्याचा इशाराही दिला हाेता. त्यावेळी महापालिकेची या जागेवर आंतराष्ट्रीय स्तरावरील उद्यानाची निर्मिती करण्याची याेजना हाेती.  रेसकोर्सच्या जागेचे थीम पार्कमध्ये रुपांतर करण्यासाठी 2013 मध्येच ठराव केला होता. मात्र, तत्कालीन काॅंग्रेस-  राष्ट्रवादीच्या सरकारने विराेध केला हाेता. बीएमसी 2013 पासून कोणतेही भाडेही स्वीकारत नाही.