औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारच्या काळात पैसे घेऊन बदल्या होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा ऋषी खैरे यांनी बदलीसाठी पैसे घेतल्याची ऑडिओ क्लिप समोर आली आहे.
घरातील दाग दागिने मोडून बदलीसाठी पैसे दिले. परंतु बदली झाली नाही अशी विनवणी संबंधित व्यक्ती करत असल्याचे या क्लिपमध्ये ऐकू येत आहे. वन खात्याच्या बदलीसाठी एका व्यक्तीकडून ऋषिकेश यांनी दोन लाख रुपये घेतल्याचे या ऑडिओ क्लिपमधून समोर येत आहे. मात्र बदलीचे काम झाले नसल्याने, तो व्यक्ती पैसे परत मागत आहे.
महाविकास आघाडीची सत्ता असताना हा व्यवहार झाल्याचा देखील या ऑडिओ क्लिप मधून स्पष्ट होते. विशेष म्हणजे ऋषिकेश खैरे यांनी देखील पैसे घेतल्याचे मान्य केले आहे. पैसे देण्याबाबत गेल्याकाही दिवसांपासून ऋषी खैरे टाळाटाळ करत आहे.
या क्लीपमधील संवाद पुढीप्रमाणे ;
ऋषी खैरे : पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथे आलो होतो.
ऋषी खैरे: हंड्रेड पर्सेंट होईल
विजय: तुम्हाला माहित आहे का भाऊ, मी घरातील सोने, चांदी देखील मोडले आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही..माझं काम देखील नाही झाले बदलीचे, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझं काम करून देतो किंवा पैसे देतो
विजय: नै काम करूच नका, काम करून घेतो मी, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडे बदलीसाठी
ऋषी खैरे: अच्छा दिलेले आहे का?
विजय: हो…
ऋषी खैरे: पैसे देऊन टाकतो
विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरच लय परेशानी चालू आहे माझी
ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो
विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी…
ऋषी खैरे: होय…
विजय: बरं ठीक आहे चालेल…
