मी बोललो तर अनेकांची अडचण होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय आमच्या बाजूनं आल्यामुळं उद्धव ठाकरे आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. आम्ही जे धडाकेबाज निर्णय घेतोय, त्यामुळं ते घाबरले आहेत, बिथरले आहेत. त्यामुळं आमच्यावर आरोप करत आहेत. आम्ही त्यांना कामाने उत्तर देऊ असंही मुख्यमंत्री म्हणाले. मी दिलेल्या गोष्टी कधी काढत नाही आणि त्यावर बोलणार नाही. मला बोलायला लावू नका. मी बोललो तर अनेकांची अडचण होईल असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.आम्हाला संपत्तीचा मोह नाही कधीही नव्हता. आम्हाला कुणाचीही संपत्ती नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे. यावर आम्हाला बोलायचं नाही असं शिंदे म्हणाले.

धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचे आम्ही स्वागत केलेले आहे. त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ती फेटाळली आहे. निवडणूक आयोगाचा निकाल कायम आहे खरी शिवसेना आमच्याकडेच असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतला दिलेली धमकी हे फक्त कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी आणि स्वतःला प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसेच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला स्टंट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याची सखोल चौकशी गृह विभागामार्फत होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.