महाराष्ट्राच्या पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे; राष्ट्रवादी कार्यालया बाहेर बॅनर

गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पोस्टर मुंबईतील राष्ट्रवादी ऑफिसच्या बाहेर लावलेले दिसून आले. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं होतं. अशातच आता पुन्हा एकदा पोस्टरची चर्चा रंगली ती म्हणजे महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे! अशा आशयाच होर्डिंग्ज लागले आहेत.

या होर्डिंग्जवर महाराष्ट्राची पहिली महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे! असा उल्लेख करण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा पोस्टरची चर्चा रंगली आहे. “महाराष्ट्रची पहिला महिला भावी मुख्यमंत्री सुप्रिया सुळे” असा मजकूर या पोस्टरवर छापण्यात आला आहे. यामध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करण्यात आला आहे.राष्ट्रवादीकडून होणाऱ्या बॅनरबाजीची सध्या सातत्याने चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वीच जयंत पाटलांच्या बॅनरची चर्चा होती, तर परवा अजित पवारांमुळे चर्चा होत असतानाच आज सुप्रिया सुळे यांचे होर्डिंग्ज लागले आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये दोन वेळा अजित पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्याचबरोबर अजित पवारांना मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल असं निलेश लंके यांनी केलं होत.तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या आहेत.