मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या आहेत. यावर्षी राज्यात दहा लाख घरांचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये प्रधामंत्री आवास योजनेंतर्गत चार लाख घरे.
ज्यामध्ये अडीच लाख घरे ही अनुसूचित जाती-जमातीसाठी तर दीड लाख घरे इतर प्रवर्गासाठी आहेत. रमाई आवास योजनेतंर्गत दीड लाख घरांची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये किमान 25 हजार घरं ही मातंग समाजासाठी राखीव आहेत. शबरी, पारधी, आदिम आवास योजनेतंर्गत एक लाख घरांची तरतुद करण्यात आली आहे.
