उद्धव ठाकरे अर्थसंकल्पावर बोलत होते, तेवढ्यात अजित पवारांनी मारला डोळा

शिंदे-भाजपा सरकारचा पहिला अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला आहे. या अर्थसंकल्पात शेतकरी, महिला, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि अन्य घटकांसाठी मोठ्या तरतूदी करण्यात आल्या. या अर्थसंकल्पावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘गाजर हलवा’ म्हणत टीका केला. पण, उद्धव ठाकरे प्रतिक्रिया देत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या हावभावावरून चर्चांना उधाण आलं आहे.

उद्धव ठाकरे बोलत असताना अजित पवार यांचे याकडे अजिबात लक्ष नव्हते. अजित पवार इकडे तिकडे पाहतात त्यांच्या बाजूला उभे असलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या खांद्यावर ते हात ठेवतात आणि डावीकडे पाहत हळूच कुणाला तरी डोळा मारतात असे व्हिडिओत दिसत आहे. अजित पवारांनी डोळा कोणाला मारला आणि कशासाठी मारला हे कळू शकलं नाही. मात्र, या प्रसंगाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.