शुभमनची दमदार शतकी खेळी, विराट-जडेजा मैदानात टिच्चून उभे; तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाचे वर्चस्व दिसून आले. गिलचे शानदार शतक, कोहलीची नाबाद अर्धशतकी खेळी आजच्या दिवसाचे वैशिष्ट्य ठरलं.सलामीचा फलंदाज शुभमन गिलचे दमदार शतक आणि विराट कोहलीची अर्धशतकी खेळी याच्या जोरावर तिसऱ्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाने वर्चस्व गाजवले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने तीन गडी गमावत 289 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसअखेर विराट कोहली आणि रविंद्र जाडेजा मैदानात आहेत. विराट कोहलीने 128 चेंडूत 59 धावा आणि रविंद्र जाडेजा 16 धावांवर नाबाद आहे. टीम इंडिया अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 191 धावांनी मागे आहे.नॅथन लायन, मॅथ्यू कुनहेमन आणि टॉट मर्फी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे आणि दोन्ही संघांना फलंदाजी करायची आहे. अशावेळी हा सामना अनिर्णित राहील अशी दाट शक्यता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी विराट कोहली नाबाद ५९ आणि रवींद्र जडेजा नाबाद १६ धावांवर खेळत होते.ऑस्ट्रेलिया संघाकडे अद्यापही १९१ धावांची आघाडी आहे. आता भारताला ही आघाडी मोडून ऑस्ट्रेलियाला पिछाडीवर नेण्याची नामी संधी आहे.