सुनील शेट्टीच्या ‘हंटर’चा ट्रेलर रिलीज; पुन्हा दिसणार अॅक्शन मोडमध्ये

सुनील शेट्टीम्हणजे बॉलिवूडचा अण्णा. त्याचं नाव घेतलं की, डोळ्यासमोर येतो तो हेराफेरी मधला श्याम, धडकन मधला देव, बॉर्डर मधला भैरव सिंग. लवकरच सुनील शेट्टी हेराफेरी ३ मध्ये दिसणार आहे. पण त्याआधी सुनीलची एक ॲक्शन पॅक्ड थ्रीलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या सीरिजचं नाव आहे, हंटर – टूटेगा नहीं तोड़ेगा. तूर्तास या सीरिजचा ट्रेलर रिलीज झालाये आणि हा ट्रेलर पाहून अण्णाचे चाहते एकदम क्रेझी झाले आहेत.’हंटर’ या सीरिजमध्ये सुनील शेट्टी एसीपी विक्रम सिंहच्या भूमिकेत झळकणार आहे.

‘हंटर’ या वेबसीरिजमध्ये सुनील शेट्टी, राहुल देव आणि ईशा देओल महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या ट्रेलरमध्ये ईशा देओलच्या भूमिकेची झलकदेखील पाहायला मिळणार आहे. ‘हंटर-टूटेगा नहीं तोडेगा’ असे ट्रेलरमधील डायलॉग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. ही सीरिज प्रेक्षकांना प्राइम व्हिडीओवर 22 मार्चपासून पाहता येणार आहे.सुनील शेट्टीचे कॉमेडी सिनेमे लोकांनी डोक्यावर घेतले. पण आजही त्याचे चाहते त्याला ॲक्शन रोलमध्ये पाहणंच पसंत करतात. त्यामुळेच हंटरचा ट्रेलर रिलीज होताच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शेट्टी अन्ना इज बॅक, अशा कमेंट्स चाहते करत आहेत.