दिल्ली कॅपिटल्सला नवा कॅप्टन मिळाला, ऋषभ पंतची जागा घेणार हा फलंदाज

इंडियन प्रीमियर लीग 2023 सुरू होण्यास आता काही दिवस शिल्लक आहेत. तर दिल्ली कॅपिटल चे अध्यक्ष पंकजा जागी नवीन कर्णधाराची घोषणा केलेली नाही मात्र रिपोर्टनुसार एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे दिल्ली कॅपिटलच्या संघाने ऋषभ पॅन्टच्या जागी संघाची कमान कोणाच्या हाती द्यायची यासाठीचा पर्याय शोधला आहे. पंत ऐवजी डेव्हिड वॉर्नर संघाचे कर्णधार पद भूषवू शकतो.छातीस वॉर्नरला आयपीएल मध्ये कर्णधार पदाचा खूप अनुभव आहे. आता पहिले विजेतेपद पटकावण्याचे फ्रंचायझीचे जिथे स्वप्न यावेळी पूर्ण होणार की नाही हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

डेविड वॉर्नर आयपीएलच्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे. 2009 ते 2013 यादरम्यान वॉर्नर दिल्ली संघाचा सदस्य होता. अखेरच्या काही सामन्यात वॉर्नरने दिल्ली संघाचे नेतृत्व सांभाळले होते. त्यानंतर तो सनरायजर्स हैदराबाद संघाचा कर्णधारही राहिलाय. SRH ने 2014 मध्ये वॉर्नरला खरेदी केले होते. त्यानंतर पुढील हंगामात वॉर्नरकडे नेतृत्व सोपवलं होतं. 2016 मध्ये वॉर्नरने एकट्याच्या जिवावर हैदराबादला अंतिम सामन्यापर्यंत नेहले होते. आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये (जिंकलेले सामने) वॉर्नर संयुक्तरित्या पाचव्या स्थानावर आहे. वॉर्नरने आयपीएलमध्ये 69 सामन्यात नेतृत्व केलेय, यामधील 35 सामन्यात विजय तर 32 सामन्यात पराभव स्विकारावा लागला होता. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. ऋषभ पंतच्या अनुपस्थित आता डेविड वॉर्नर दिल्लीच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ कशी कामगिरी करतो? याकडे आयपीएल प्रेमींचं लक्ष लागलेय.