महाराष्ट्रातील लव्ह-जिहादला लष्कर- ए- ताेयबाचे फंडींग, धर्मांतर विराेधी कायदा आणण्याची नितेश राणे यांची मागणी

मुंबई :  महाराष्ट्रातील लव्ह- जिहादला दहशतवादी संघटना लष्कर- ए- ताेयबा फंडींग करत आहे. त्यामुळे राज्यात  धर्मांतर विराेधी कायदा आणण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे  नितेश राणे यांनी केली. विधानसभेत महिला व बालकल्याण विकास विभागासाठी अर्थसंकल्पात असलेल्या तरतुदीबाबत बाेलताना राणे म्हणाले, अर्थसंकल्पात लेक लाडकी या याेजनेला नव्या स्वरुपात आणले आहे. मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षांची हाेइपर्यंत तिची काळजी घेतली आहे. मात्र, जेव्हा मुलगी 18 वर्षांची हाेते आणि समाजात वावरायला लागते तेव्हा तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहिले जाते तेव्हा आई- वडील आणि समाज म्हणून लक्ष देण्याची गरज आहे.

आज महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात पन्नास हजार ते लाखांचे हिंदू आक्राेश माेर्चे निघत आहेत. महाराष्ट्रामध्ये लव्ह-जिहाद विराेधात, धर्मांतर विराेधात कायदा आणावा अशी या माेर्चांची मागणी आहे. लव्ह- जिहाद, धर्मांतरणाच्या निमित्ताने मुलींचे आयुष्य खराब करण्याचे षडयंत्र रचले जाते तेव्हा आपण समाज म्हणून आणि राज्य म्हणून विचार करायला पाहिजे.


आंतधर्मीय विवाहासंदर्भात राज्य सरकारने समिती तयार केली आहे त्याचे काैतुक करायला पाहिजे असे सांगून राणे म्हणाले, त्यावरही टीका करणारे लाेक आहेत. या समितीची गरज काय, काेणीही काेणाशी लग्न करू शकते असे म्हणत आहेत. काेणी काेणाशी लग्न करावे याबाबत काेणाचाही आक्षेप नाही. पण तुम्ही लग्न काेणत्या कारणासाठी करताय. लग्न केल्यावर त्या मुलीचा धर्म बदलण्याची गरज काय आहे? यातून एकाही लाख साेडा, हजार साेडा एकाही मुलीचे आयुष्य खराब हाेत असेल तर तिला आपल्याला वाचवायला पाहिजे.

एका मुलीला मी नागपूरला भेटलाे हाेताे. तिने एका मुलाच्या प्रेमात पडल्यावर झालेली तिच्या आयुष्याची परवड सांगितली. त्या मुलाने लग्नानंतर मुलीचे नाव बदलले, धर्मही बदलला. मी माझ्या देवी-देवतांना नमस्कारही करू नये यासाठी जबरदस्ती केली जाते. लव्ह जिहाद हे साधे प्रकरण नाही असे सांगून राणे म्हणाले, साैदी अरेबियापासून ते लष्कर-ए- ताेयबापासून अनेकांकडून पैसे पुरविले जातात. या मुलींना फसवून कसेतरी देशाबाहेर घेऊन जायचे. तिला विकायचे आणि त्या मुलीचे आयुष्य बरबाद करायचे असे प्रकार घडत आहेत.