छत्रपती संभाजीनगरमध्ये ९ ठिकाणी ईडीची छापेमारी; १९ जणांवर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. पंतप्रधान आवास योजना प्रकरणी हि छापेमारी करण्यात आली आहे. कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत.या प्रकरणी ईडीकडून ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळीच ईडीकडून शहरातील 3 ठिकणी छापेमारी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली असल्याचे समोर आले आहे.

छत्रपती सभाजीनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या ४० हजार घरांसाठी तब्बल ४ हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रक्ट देण्याबाबतच्या या निविदा काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी रमरथ कन्ट्रक्शन,ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांनी यासाठी निविदा सादर केली होती. पण या सर्व निविदा एकाच आयपीवरुन भरल्या असल्याचे उघड झाल्यानंतर याबाबतची चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एकाच आयपीवरुन निविदा भरल्या गेल्याने यामध्ये अटींचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.

समरथ मल्टीविज इंडिया, पुणे येथील सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन यासह चार कंपन्यांनी निविदा भरली होती. 40 हजार घरांसाठी चार हजार कोटींचा हा घरकुलाचा प्रकल्प उभारला जाणार होता. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हर्सल, सुंदरवाडी, चिकलठाणा या ठिकाणची १२८ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली होती.