मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (१७ मार्च) मुंबईत होणार आहे. रोहित शर्मा पहिल्या वनडेत खेळणार नाही. कौटुंबिक कारणांमुळे तो बाहेर आहे. पहिल्या वनडेत कर्णधार शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. तसेच मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १७ मार्चला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा सामना हा १९ डिसेंबरला विशाखापट्टणम येथे होईल. या वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना हा २२ मार्चला चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. पण या मालिकेतील सामने नेमके किती वाजता खेळवण्यात येणार आहे, याची माहिती आता समोर आली आहे.
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत शुभमन गिलसह ईशान किशनला ओपनिंगमध्ये संधी मिळणे जवळपास निश्चित आहे. जखमी श्रेयस अय्यरच्या जागी मधल्या फळीची जबाबदारी सूर्यकुमार यादव किंदवा रजत पाटीदार यांच्यापैकी
एकाला दिली जाऊ शकते. कर्णधार पंड्या पहिल्या सामन्यात विकेटकीपर म्हणून केएल राहुलला संधी देऊ शकतो. जर केएल राहुल बाहेर बसला असेल तर इशान किशन यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळू शकेल. या स्थितीत रजत पाटीदार आणि सूर्यकुमारसोबत एकत्र खेळू शकतात.
वानखेडेवरील आकडेवारी
दोन्ही संघ आतापर्यंत वानखेडेवर एकूण 4 वनडे सामन्यात भिडले आहेत. इथेही कांगारु वरचढ ठरले आहेत. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 3 वेळा विजय मिळवलाय. तर टीम इंडियाला फक्त एकदाच कांगारुना पराभूत करता आलं आहे. आकडेवारी जरी कांगारुंच्या बाजूने असली तरी गेल्या काही वर्षांची कामगिरी पाहता टीम इंडियाचा बोलबाला आहे. त्यामुळे पहिल्या सामन्यात काय होतं, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
