वादळी आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आहे. झालेल्या नुकसानीनं बळीराज्याला अश्रू अनावर झाले आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवा असं आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, अवकाळी, गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती आणि फोटो पाठवण्यात सांगितलं आहे. कृषिमंत्र्यांनी मोबाईल क्रमांकही जाहीर केला आहे. बंगला आणि कार्यालयातील मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत.
यासाठी कृषिमंत्र्यांनी मोबाईल क्रमांकही जाहीर केलेत. बंगला आणि कार्यालयातील मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आलेत. अवकाळी, गारपिटीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानीची माहिती आणि फोटो पाठवण्यात सांगितलं आहे.यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून 9922204367 आणि 02222876342 हे क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना तुमचं नुकसान झालं असेल तर कृषिमंत्र्यांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन करुन माहिती द्या असं यावेळी आवाहन करण्यात आलं आहे.
