बिश्नोईकडून सलमानला पुन्हा धमकी; गुन्हा दाखल

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून पुन्हा धमकी देण्यात आली आहे. याबाबत मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईसह तीन जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारी सलमानच्या ऑफिसच्या मेल आयडीवर एक ई-मेल पाठवण्यात आला. त्यामध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसंच, एबीपी सांझाचे संपादक जगविंदर पटियाल यांनी काही दिवसांपूर्वी लॉरेन्सची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीचा उल्लेखही ई-मेलमध्ये आढळला आहे. सलमाननं ही मुलाखत पाहिली असेलच, नसेल पाहिली तर लगेच पाहायला सांगा, असंही या हिंदीत लिहिलेल्या ई-मेलमध्ये लिहिलं होतं.

मुंबई पोलिसांनी याआधी सलमान खानच्या कार्यलायात धमकीचा ईमेल पाठविल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गुंडांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तुरुंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि मोहित गर्ग या गुंडाच्या विरोधात गुन्हा नोंद केला. अभिनेता सलमानचे मॅनेजर आणि जवळचे मित्र प्रशांत गुंजाळकर यांनी ही तक्रार केली.या संदर्भात वांद्रे पोलिसांनी आयपीसीच्या कलम 506(2), 120(बी) आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि घराबाहेर सुरक्षा देखील वाढवली आहे. पोलिसांनी सलमान खानच्या ऑफिसला ईमेल पाठवल्याप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी ब्रार आणि रोहित गर्ग या गँगस्टर्सविरोधात गुन्हा दाखल केला.