काही पोलिस अधिकारी आजही असे आहेत, जे ‘मविआ’च्या प्रेमात आहेत. ते हिंदुत्ववादी तरुणांना मदत करत नाहीत. राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आहे. कुणीजर जर हिंदुत्ववादी तरुणांना मदत केली नाही, तर त्या अधिकाऱ्यांना आम्ही जास्त काळ त्या खुर्चीवर ठेवणार नाही, असा इशारा भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी दिला.समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्दयावरून केलेल्या वक्तव्यावर जोरदार हल्लाबोल राणे यांनी केला. राज्याचे गृहमंत्री कडवट हिंदुत्वावादी आहेत. जर अधिकाऱ्यांनी हिंदू तरुणांची मदत केली नाही, तर त्यांनी बॅगा भरायला घ्याव्यात असा सल्लाही राणे यांनी दिला
दौंडमध्ये कुमल कुरेशी नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीने हिंदू तरुणाचा जबरदस्तीने सुंता करून त्यांचे धर्मांतर केले. ही घटना 14 ऑक्टोबर 2022 रोजी घडल्याचा आरोप दौंडमधील धर्मांतर प्रकरणाचा व्हिडिओ नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दाखवला. व्हिडिओमध्ये कुमल कुरेशी या व्यक्तीच्या पत्नीने काही धक्कादायक खुलासे केलेत. ती म्हणते की, माझे पती कुमल कुरेशी यांनी अनेकांची धर्मांतर केले. असं राणे म्हणाले जर मुस्लीम तरुणांना हिंदू मुलीशी लग्न करायचे असेल, तर त्यांनी तिला हिंदू राहू देत केले पाहिजे. तुम्ही तिचा धर्म बदलायला लावता हे चुकीचे आहे. हा लव्ह जिहाद होत नाही हे, जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमी जे म्हणतायत त्यांनी हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. हे पुरावे आम्ही कोर्टात दाखल केले आहेत. ज्या तरुणांचे धर्मांतर केले त्यांचे कुटुंबीय घाबरून दौंड सोडून पळून गेले. धर्मांतरांच्या 1 लाख केस आहेत. हा व्हिडिओ बघितल्यानंतर असे दिसते की हिंदू तरुणांना धमकी देतात. त्यांच्या कुटुंबियांना दहशतीत ठेवतात. म्हणून पुढे केस दाखल करता येत नाही. श्रीरामपुरात एका विवाहित हिंदू महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्या 14 वर्षीय मुलीचे बळजबरीने लग्न लावून तिला धर्मांतर करण्यासाठी दबाव आणला गेला. ती 7 महिन्यांची गर्भवती आहे.
राणे म्हणाले की, कुमल कुरेशी सारख्या लोकांना म्हणजे एक प्रकारे या जिहादी लोकांना मदत करत आहात. या विरोधात कडक कायदा राज्यात आणणार आहोत. कमल कुरेशी यांची बायको त्यांच्याविरोधात बोलते. जर तिच्या पोटावर बंदूक रोखली जाते तर हिंदू समाजाचे तरुण आणि तरुणी कसे पुढे येतील. 2047 ला इस्लामिक राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदूची लोकसंख्या कमी करण्याचा हे षंडयंत्र आहे. एक लाख केस असो 1 केस ती ही महत्त्वाची आहे. साडेतीन हजार हा आकडा देखील मोठा आहे. हे जिहादी विचाराचे लोक मुलींना बाहेर विकायचे काम ही करतात.
राज्यातील प्रत्येक केसवर लक्ष ठेवून आहोत. जितेंद्र आव्हाड आणि अबू आझमींनी काही केले तरी आम्ही हिंदूत्ववादी तरुण आणि तरुणींच्यासोबत आहोत, असे सांगून माझ्याविरोधात कितीही केस केल्या, तरी मी या प्रकरणी कायम सर्वांच्यासोबत राहिल . धर्मांतरविरोधी सर्वांत कडक कायदा महाराष्ट्रात असेल, तेव्हा धर्मांतर करण्याआधी त्यांचे हात कापतील. कुमल कुरेशीच्या बायकोने मला कॉल करत तिला वाचविण्याची विनंती केली. एका हिंदू तरुणांने मुस्लीम तरुणीशी लग्न करण्यासाठी त्यांची सुंता करण्यात आली. आणि नंतर त्यांचे धर्मांतर करण्या आले, हे कुणाला सांगायचे नाही असा त्याला दम देण्यात आला.
राज्यात गेल्या 5 महिन्यांत लव्ह जिहादची एकही तक्रार आलेली नाही. महिला बालकल्याण आयुक्तांनीच मला ही माहिती दिली आहे, असे आज विधानसभेत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी काल सांगितले होते.
