मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना विधानसभेत चांगलेच खडसावले.मुख्यमंत्र्यांना खोके म्हणणे, मिंधे म्हणणे, चोर- गद्दार म्हणणे हे कुठल्या आचारसंहितेत बसते ? असा सवाल विचारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना खडे बोल सुनावले आहेत.
राहुल गांधींच्या विधानावरून सभागृहात सत्ताधारी व विरोधकांनी तीव्र गदारोळ निर्माण झाला होता. यावेळी विरोधकांना सुनावताना मुख्यमंत्री म्हणाले, मिंधे गट म्हणणे कोणत्या आचारसंहितेत बसते? तुम्ही बाहेर जाऊन देशाचा वारंवार अपमान करत असाल तर खपवून घेणार नाही. विधानभवन परिसरात 8 महिने आमच्याविरोधात घोषणाबाजी केली ते चालले का?
पंतप्रधानांच्या मातोश्रींचे निधन झाले आणि ते लगेचच कर्तव्यावर गेले. त्या पंतप्रधानांना तुम्ही चोर म्हणता असा सवाल करत एकनाथ शिंदे म्हणाले, जर आमच्या पंतप्रधानांचा अपमान करणार असाल, तर या देशातील जनता आणि आम्ही सहन तो सहन करणार नाही. सदनाचा मान सन्मान सर्वांनीच राखला पाहिजे. बोलताना सर्वांनी तारतम्य बाळगले पाहिजे.
