गेल्या आठवडाभरापासून राज्यातील वातावरणात मोठा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाळा आणि रात्री जोरदार थंडी पडल्याचं दिसून येत आहे. वातावरणात सातत्याने होत असलेल्या बदलामुळे राज्यात पावसाचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान, राज्यात आजपासून पुन्हा एकदा मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात मागच्या 24 तासांत कोकण, उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस झाला आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
राज्यात मागच्या 24 तासांत कोकण , उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस झाला आहे. तर आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता असल्याचीही माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान तमिळनाडूपासून कर्नाटक, तेलंगणा, विदर्भ ते छत्तीसगडपर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
