ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पुन्हा एसीबी चौकशी

रत्नागिरीतील राजापूरचे ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची आज एसीबी चौकशी होणार आहे. त्यांची ही चौथ्यांदा चौकशी होत असून आमदार साळवी कुटुंबासह आज शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजता अलिबाग येथील एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत. आपल्याला त्रास देण्यासाठी हा प्रकार सुरु असल्याची टीका राजन सावळी यांनी केली होती. चौकशीला सहकार्य याआधी केला आहे. कागदपत्रेही दिली आहेत, असे असताना पुन्हा पुन्हा बोलावून त्रास देण्याचा प्रकार सुरु असल्याचे सावळी म्हणाले.

आमदार साळवी कुटुंबासह अलिबाग येथे चौकशीसाठी हजर राहणार आहेत. तसेच उद्या शनिवारी देखील दिवसभर साळवी कुटुंबाची अलिबाग येथे एसीबी समोर चौकशी होण्याची शक्यता आहे.

याआधी राजन साळवी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात आधीच्या चौकशीदरम्यान मागितलेली मालमत्ताविषयक कागदपत्रे सादर केलीत. तसेच ते स्वत: हजर राहून चौकशीला सामोरे गेले होते. त्यानंतर 20 जानेवारी रोजी साळवी यांची 6 तास एबीसी अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. तसेच साळवी यांना 22 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहायला सांगितले होते. त्यावेळी ते उपस्थित राहिले होते.