अंधारेताई मर्यादा पाळा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर कोणत्या अधिकाराने बोलता? – निलेश राणे

अंधारेताईंनी देखील मर्यादा पाळल्या पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर कोणत्या अधिकाराने तुम्ही बोलता, असा सवाल भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला. बीड येथे पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले.

सुषमा अंधारे ज्या तऱ्हेने बोलतात जसं की त्या दोन-तीन टर्म निवडणुका लढल्या आहेत. कधी मंत्री होत्या का? त्यामुळे नेमका हा कॉन्फिडन्स त्यांच्यात कुठून आला? हेच कळत नाही.अंधारे एकदा ही निवडणूक लढल्या नाहीत. माझ्यापेक्षा तुम्ही तीन वर्षांनी लहान आहात. आहेत. भाषा वापरतात त्यावर मर्यादा आल्या पाहिजे. संजय राऊत यांच्यावर टीका करताना राणे म्हणाले संजय राऊत रिकामटेकडे आहेत. त्यांना दुसरे काहीच काम नाही. महाराष्ट्रात त्यांची किंमत काय?पत्रा चाळचा तो आरोपी आहे.