‘आदिपुरूष’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ‘या’ दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित

गेल्या काही दिवसांपासून चाहते साऊथ स्टार प्रभास याच्या आदिपुरुष या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये सतत बदल होताना दिसत होते. यापूर्वी दोन वेळा आदिपुरुष चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आलीये. प्रभास या चित्रपटामध्ये धमाका करताना दिसणार आहे. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ सुरूवातीपासूनच बघायला मिळत आहे. मात्र, आता प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली आहे. नुकताच आदिपुरुष चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आलीये. यामुळे चाहत्यांमध्ये आता आदिपुरुष चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता बघायला मिळत आहे.

आता मात्र टी-सिरिज आणि दिग्दर्शक ओम राऊत यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ‘आदिपुरुष’च्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली आहे. या फोटोमध्ये टी-सिरिजचे मालक भूषण कुमार आणि दिग्दर्शक ओम राऊतही आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही पोस्ट शेअर करत ‘आदिपुरुष’ हा चित्रपट १६ जून २०२३ रोजी चित्रपटगृहात ३डी मध्ये प्रदर्शित केला जाणार असल्याची त्यांनी घोषणा केली आहे.

‘आदिपुरूष’ चित्रपट यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होताच चित्रपट व्हिएफएक्सच्या बाबतीत खूपच वाईट म्हणत चित्रपटाला ट्रोल केले. यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असून निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे, चित्रपटात बरेच बदल करण्यात आले आहेत. 11 ऑगस्ट 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार होता, पण व्हिएफएक्समुळे चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.