स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांची माफी मागितल्याचा पुरावा द्यावा अन्यथा खटला दाखल करू, असा इशारा रणजित सावरकरांनी दिल्यानंतर राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या कथित माफी बद्दलचे सारे ट्विट्स माघारी घेतले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. सुरत न्यायालयाच्या निकालानंतर बोलताना माफी मागायला मी राहुल गांधी आहे सावरकर नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून राहुल गांधी यांच्यावर टीका होत आहे. सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी राहुल गांधींना थेट आव्हान दिले. स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांची माफी मागितली याचे पुरावे द्या अन्यथा गुन्हा दाखल करील असा इशारा त्यांनी दिला होता.यानंतर मंगळवारी अचानक राहुल गांधींनी सावकरांविषयीचे सर्व ट्विट्स डिलीट केल्याची चर्चा सोशल मिडीयावर होऊ लागली आहे. राहुल गांधी यांना विरोधी पक्षांच्या बैठकीत शरद पवार यांनीही सुनावले होते. त्यामुळे सावरकरांचा विषय बाजूला ठेवण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याची चर्चा आहे
